पीटीआय, कराची / इस्लामाबाद
बलुचिस्तानमध्ये रेल्वे अपहरणनाट्यात २१ प्रवासी व निमलष्करी दलाच्या चार जवानांचा मृत्यू झाला. या मोहिमेत सुरक्षा दलांनी सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

क्वेट्टाकडून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसच्या ९ डब्यांमध्ये ४४० प्रवासी होते. क्वेट्टापासून १६० किमी अंतरावर डोंगराळ प्रदेशातून जात असताना गुदलार आणि पिरू कुनरी येथे बोगद्यात स्फोट घडवून ती ताब्यात घेतली. ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलांनी १९० प्रवाशांची सुटका केली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांशी सातत्याने संपर्क केला. त्यावरून यामागे परकीय हात होता हे स्पष्ट असल्याचे शरीफ यांनी नमूद केले. गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी सुरक्षा दलांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व ३३ दहशतवाद्यांना (पान १० वर)(पान १ वरून) ठार केल्याचे त्यांनी सांगितले. निरपराध मुले आणि महिलांचा मानवी ढाल म्हणून वापर करणे चुकीचे असल्याचे नक्वी यांनी स्पष्ट केले. या घटनेमागच्या सुत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या जवळपास ३० जखमी प्रवाशांना घटनास्थळाजवळ तैनात केलेल्या रुग्णवाहिकामधून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Story img Loader