Pakistan Train Hijack Highlights : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये अतिरेक्यांनी मंगळवारी क्वेट्टा येथून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेस या प्रवासी रेल्वेगाडीवर हल्ला चढवला. पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेने बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ट्रेनचं अपहरण केल्यानंतर त्यांनी १८२ प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हा दावा खोडून काढला. तसंच जवळपास ३५० प्रवासी सुखरुप असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी आणि ताजे अपडेट्स जाणून घेऊयात.

Live Updates

Pakistan Jaffar Express Attack LIVE Updates : पाकिस्तान ट्रेन हायजॅक प्रकरणी ताजे अपडेट्स जाणून घ्या!

12:56 (IST) 12 Mar 2025

Pakistan Railway Hijack : पाकिस्तानात रेल्वेसेवा खंडीत

पंजाब आणि सिंध प्रांतातून बलुचिस्तानला जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा पाकिस्तानने रद्द केल्या आहेत.

11:28 (IST) 12 Mar 2025

Pakistan Train Hijack Update : पोलिसांनी १५५ ओलिसांची केली सुटका, २७ दहशतवाद्यांचा खात्मा!

पोलिसांनी १५५ ओलिसांची सुटका केली असून २७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये मुलं आणि महिलांचा समावेश अशून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

https://twitter.com/ANI/status/1899696753429082476

10:43 (IST) 12 Mar 2025

“बलुचिस्तानच्या जन्माची वेळ…”, निवृत्त मेजर जनरल बक्षी यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “स्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर”

भारताने या घटनेवर अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलं नसलं तरी भारतीय लष्करातून निवृत्त झालेले मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “बलुचिस्तान आता पूर्णपणे पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेलं आहे. तिथली सध्याची स्थिती व जनतेचा उद्रेक पाहता स्वतंत्र बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आली आहे असं म्हणावं लागेल.”

सविस्तर वृत्त वाचा

10:41 (IST) 12 Mar 2025

अपहृत ट्रेनमधील १०४ ओलिसांची सुटका, पाकिस्तानी लष्कराचा दावा; चकमकीत ३० जवान शहीद, बलुचिस्तानमध्ये काय घडतंय?

पाकिस्तानी सरकारने या घटनेबाबत, त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईबाबत फारशी माहिती उघड केली नसली तरी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) जाफर एक्सप्रेसमधील सुरक्षा दलांसह २१४ हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे.तसेच, यावेळी फुटीरतावादी व पाकिस्तानी लष्कराबरोबर झालेल्या संघर्षात लष्कराचे ३० जवान शहीद झाल्याचा दावा बीएलएने केला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

10:41 (IST) 12 Mar 2025

Pakistan Train Hijack Update : जाफर एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या माहितीसाठी नातेवाईक प्रतिक्षेत

जाफर एक्स्प्रेससाठी माहिती डेस्क अशी सूचना असलेली खास चौकशी खिडकी क्वेटा रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. या खिडकीवर अपहृत ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येतेय. या स्थानकावर अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, स्थानकावर भीषण शांतता आहे. काही वाहने आणि मिडिया कर्मचाऱ्यांशिवाय इथे चिटपाखरूही दिसत नाही. मुख्य तिकिट काऊंटरवरील कर्मचाऱ्यांना जाफर एक्स्प्रेसबद्दल विचारलं असता, ते शांतपणे उत्तर देतात की, साहेब आम्हाला काहीही माहिती नाही. बोलानमधून आतापर्यंत कोणतीही माहिती आलेली नाही. पाकिस्तानस्थित डॉन या वृत्त संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Pakistan Jaffar Express Attack LIVE Updates : पाकिस्तान ट्रेन हायजॅक प्रकरणी ताजे अपडेट्स जाणून घ्या!

Story img Loader