पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका घटनेत कलिंगडाची चोरी करताना पकडलेल्या दोन मुलांना विवस्त्र करून रस्त्यावरून फिरवण्याच्या प्रकरणी पाकिस्तानी पोलिसांनी दोन जणांना अटक केली. याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकारी फिरोज म्हणाले, बशारत आणि इरफानने त्यांच्या दुकानातून नऊ आणि १३ वर्षांच्या दोन मुलांना कलिंगडाची चोरी करताना पकडले. दोघांनी मुलांना यातनाच दिल्या नाहीत तर त्यांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. मुलांचा व्हिडिओ बनवून अपशब्ददेखील वापरले. त्यातील एका मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बशारत, इरफान आणि त्यांच्या अन्य साथीदारांना अटक केल्याचे फिरोज यांनी सांगितले. ज्या मोबाईल फोनचा वापर मुलांचा व्हिडिओ तयार करण्यासाठी करण्यात आला होता ते मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती फिरोज यांनी दिली.

Story img Loader