पाकिस्तानी सैन्याकडून आज रविवार पहाटे पुन्हा एकादा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पहाटे तीनच्या सुमारास नियंत्रण रेषेवरील मेंधर सेक्टरयेथील भारतीय तळावर गोळीबार करण्यात आला.
“पू्ँछ जिल्ह्यातील मेंधर सेक्टरमधील भारतीय तळावर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. पाकिस्तानी सैन्याने शनिवारीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी जिल्ह्यातील बालाकोट आणि त्रिकुंडी भागातील तळावर गोळीबार केला.” अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते आर.के.पाल्टा यांनी दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2013 रोजी प्रकाशित
पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानी सैन्याकडून आज रविवार पहाटे पुन्हा एकादा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पहाटे
First published on: 25-08-2013 at 05:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan violates ceasefire again along loc in poonch india retaliates