पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत, पूँछमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांच्या दिशेने शनिवारी जोरदार गोळीबार केला.
भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.  पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराचा फायदा घेऊन काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिका-यांनी दिली. पाकिस्तानच्या सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दहशतवाद्यांकडूनही गोळीबार करण्यात आला. मात्र भारताने केलेल्या कारवाईपुढे घुसखोरांचे लक्ष्य विफल ठरले. याआधीही २५ एप्रिल रोजी पाकिस्तानकडून भारतीय चौक्यावर गोळीबार करण्यात आला होता. नऊ दिवसातील हा तिसरा गोळीबार आहे.

Story img Loader