जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर बुधवारी पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. राजौरी विभागातील नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. काही दिवसांपूर्वी सीमेपलिकडून घुसखोरी करण्याच्या प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून गोळीबार झाला असून, दोन्ही देशांतील शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.
राजौरीला लागून असलेल्या पूंछमध्येही पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. सुमारे ३० मिनिटे हा गोळीबार सुरू होता. त्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्यावर सकाळी सव्वा अकरा वाजता गोळीबार थांबला. गोळीबारात भारतीय सैन्यातील कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Story img Loader