भारतीय सीमा सुरक्षा दलाचा जवान जखमी
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक(एलओसी) पाकिस्तानी लष्कराची वळवळ सुरूच आहे. शनिवारी रात्री जम्मूतील कनाचक सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याने सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) तळावर जोरदार गोळीबार केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. पाकिस्तान लष्कराकडून गेल्या आठवड्याभरात भारतीय तळावर करण्यात आलेला हा तिसरा हल्ला आहे.
पूँछमधील सरला या गस्तीस्थळावर घुसखोरी करत पाकिस्तानने मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. शुक्रवारी रात्री पुन्हा तीच आगळीक करत पाकिस्तानी लष्कराने दुर्ग बटालियन या भागात जोरदार गोळीबार सुरू केला होता. शनिवारी पहाटे साडेचापर्यंत चाललेल्या या गोळीबारादरम्यान पाकिस्तानने सात हजार फैरी झाडल्या व तोफगोळ्यांचा मारा केला. भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत साडेचार हजार फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा काल शनिवार रात्री जम्मूतील बीएसएफ तळावर पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा