पाकिस्तानी सैन्याने रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीच्या नियमाचे उल्लंघन केले. गेल्या १२ तासांमध्ये पाकिस्तानी लष्कराने तिसऱ्यांदा नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर बेछूट गोळीबार केला आहे. नियंत्रण रेषेनजीकच्या जम्मू आणि पुंछ खोऱ्यात करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. पुंछमधील हमीरपूर भागात पाकिस्तानकडून सकाळी ८.४०च्या सुमारास स्वयंचलित शस्त्रांच्या सहाय्याने गोळीबार केल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली. यापूर्वी पहाटे तीनच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने आर.एस.पुरा आणि अर्निया भागातील भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू केल्याने भारतीय जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पहाटे साडेपाच वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरू होता. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

Story img Loader