Pakistan Violence over Israel Hezbollah War IDF Killed Hezbollah Commander Nasrallah : इस्रायलने शनिवारी (२८ सप्टेंबर) लेबनॉनमधील हेझबोला या दहशतवादी संघटनेच्या तळांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात हेझबोलाचा म्होरक्या हसन नसरल्लाह ठार झाला आहे. इस्रायली डिफेन्स फोर्सेसने व हेझबोलाने नसरल्लाहच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. आता नसराल्लाह जगाला घाबरवू शकणार नाही, असं इस्रायलने म्हटलं आहे. दरम्यान, नसराल्लाहच्या मृत्यूचे अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पाकिस्तामधील एक मोठा वर्ग नसरल्लाहच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करत आहे. रविवारी (२९ सप्टेंबर) कराचीमध्ये तीन हजारांहून अधिक लोक रस्त्यांवर उतरले होते. या जमावाने इस्रायल व अमेरिकेविरोधात घोषणाबाजी केली. तसेच लोकांनी दगडफेकही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जमावाच्या दगडफेकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात सात पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले आहेत. आंदोलन खूपच हिंसक झाल्यानंतर पोलिसांना जमावावर अश्रूधुराचा मारा करावा लागला. तसेच पोलिसांनी लाठीहल्ला देखील केला. पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर जमाव पांगला. मात्र त्यांनी तिथून पळ काढत असताना पोलीस, त्यांची वाहन व इतर वाहनांची, बसेसची तोडफोड केली. उपद्रव करणाऱ्या लोकांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. या हिंसाचारप्रकरणी अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> हेजबोलाचा आणखी एक नेता ठार; इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले सुरूच

जमाव अमेरिकेच्या दूतावासाकडे जाणार होता

आंदोलन करणारा जमाव कराचीमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता. हा जमाव अमेरिकेविरोधात घोषणा देत होता. परंतु, पाकिस्तानी प्रशासनाने स्पष्ट केलं की त्या दिशेने कोणलाही जाता येणार नाही. पोलिसांनी जमावाला दूतावासापासून दूरवर रोखलं. दरम्यान, या जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. बराच वेळ रस्त्यावर हिंसाचार चालू होता.

हे ही वाचा >> लेबनॉनमधील हेजबोलानंतर इस्रायलचा हुथी बंडखोरांवर हवाई हल्ला; येमेनमधील होदेदाह बंदराला केलं लक्ष्य!

आंदोलन कोणी पुकारलं होतं?

पाकिस्तानमध्ये Majlis Wahadatul Muslimeen नावाची एक संघटना सक्रीय आहे. या संघटनेने कराचीमधील नागरिकांना आंदोलनाची हाक दिली होती. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचं आयोजन केलं होतं. मजलिस ही एक कट्टरतावादी संघटना असल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा >> Israeli PM Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी UN मध्ये भारताचा नकाशा दाखवला; मध्य-पूर्वेतील संघर्षावर मोठं वक्तव्य

कोण होता हसन नसरल्लाह?

हसन नसरल्लाह याचा जन्म १९६० साली लेबनॉनमधील बेरूत येथे एका गरीब शिया कुटुंबात झाला. धर्मातील स्वारस्यामुळे त्याला इराकमधील नजफ येथील शिया सेमिनरीमध्ये शिकण्यास पाठविण्यात आले. तो सेमिनरीमधील सय्यद मुसा सदर यांसारख्या प्रमुख धर्मगुरूंमुळे प्रभावित झाला होता. १९७५ मध्ये सुरू झालेल्या लेबनीज गृहयुद्धाचा नसरल्लाह याच्या जीवनावर परिणाम झाला होता. तो पूर्वी शिया मिलिशियामध्ये सामील झाला आणि त्यानंतर इस्रायल व पाश्चात्त्य प्रभावाला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिजबुल या संघटनेत सामील झाला.