पाकिस्तानला भारताशी परस्पर सामंजस्य व सार्वभौमत्व समतेवर आधारित असे सुरळित व शांततामय संबंध हवे आहेत, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केले असून भारत हा महत्त्वाचा शेजारी देश असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्या निवासस्थानी सांगितले की, भारत हा चांगला शेजारी देश आहे. आपल्या देशाचे शेजारी देशांशी म्हणजे भारताशी चांगले संबंध असावेत अशी आमची इच्छा आहे.
बसित यांना पाकिस्तान-भारत यांच्यातील संबंधांबाबत काही माहिती दिली. पंतप्रधानांनी त्यांना असे सांगितले की, या भागातील सर्व देशांशी पाकिस्तानचे चांगले संबंध असले पाहिजेत. दोन्ही देशांनी जम्मू-काश्मीर प्रश्न शांततामय मार्गाने सोडवावा अशी अपेक्षा शरीफ यांनी व्यक्त केली. भारताने परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा काश्मिरी विभाजनवादी नेते इस्लामाबाद येथे गेल्या ऑगस्टमध्ये सुरू होण्यापूर्वीच बसित यांना दिल्लीत भेटले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध काहीसे ताणले गेले आहेत. भारत- पाकिस्तान यांनी असे म्हटले आहे की, दोन्ही देशांनी अर्थपूर्ण संवादासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा