पूर आणि महागाईचा सामना सामना करत असलेला पाकिस्तान पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू करण्याची शक्यता आहे. ”पूर आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आम्ही भारतासोबत व्यापार मार्ग पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी दिली आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – अमेरिकेत भारतीय कुटुंबाने उभारला अमिताभ यांचा पुतळा!

pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Rajender Meghwar Pakistans first Hindu cop
पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी; कोण आहेत राजेंद्र मेघवार?
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार रद्द, कारण काय? याचा काय परिणाम होणार?
Green chillies from Vidarbha, Green chillies,
विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य

पाकिस्तानात नुकत्याच आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच महागाईदेखील प्रचंड वाढली आहे. भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकार भारतातून भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ आयात करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी दिली आहे. तसेच भारतासोबत व्यवसाय सुरू करण्याचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानातील भाज्यांचे भाव प्रचंड वाढले आहेत. लाहोरच्या बाजारात कांदा ५०० रुपये प्रति किलो आणि टोमॅटो ४०० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. पुरामुळे बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधील भाज्यांच्या पुरवठ्याला मोठा फटका बसल्याने आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ‘दिल्ली शिक्षण विभागातही गैरव्यवहार’; वर्गबांधणी खर्च ३२६ कोटींनी फुगवला; भाजपचा ‘आप’ सरकारवर आरोप

सध्या लाहोर आणि पंजाब या शहरांमध्ये अफगाणिस्तानातून कांदा आणि टोमॅटोचा पुरवठा केला सुरू आहे. यापूर्वी लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनीही सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकतो, असे म्हटले होते.

दरम्यान, मार्च २०२१ मध्ये, पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने वाघा सीमेवरून भारतातून ०.५ दशलक्ष टन साखर आणि कापूस आयात करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही दिवसांतच हा निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णयाला पीएमएलएन आणि पीपीपीने विरोध केला होता.

Story img Loader