रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. रशियाकडून युक्रेवर हवाई हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेन देखील रशियासमोर शरणागती पत्कारण्यास तयार नसून रशियाला प्रत्युत्तर देत आहे. परिणामी युक्रेनचं रुपांतर सध्या युद्धभूमी झाल्यासच पाहायला मिळत आहे. या युद्धाचे पडसाद जागतिक स्तरावर पडताना दिसत आहे. तर, युक्रेनमधील युक्रेनियन नागरिकांसह अन्य देशांच्या नागरीक मिळेल त्या मार्गाने आणि युक्रेन सोडत आहेत. यामध्ये अन्य देशांचे नागरीक मायदेशी परतण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केलेली आहे. या अंतर्गत आतापर्यंत अनेक विद्यार्थी व नागरीक सुखरूप परतले आहेत. दरम्यान, युद्धभूमी युक्रेनमधून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थी हे देखील भारतीय ध्वजाचा आधार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
Russia Ukraine War News Live Updates: “पुतीन यांना रणांगणावर यश मिळेलही पण…”; जो बायडन यांचा इशारा
युक्रेनमधून रोमानियात आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले की, “युद्ध सुरू असताना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थी भारतीय ध्वजाचा वापर करत आहेत.” तसेच त्यांनी हे देखील सांगितले की, “भारतीय ध्वज आणि भारतीय या दोघांची पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांना खूप मदत होत आहे.” आज जवळपास २२० भारतीय विद्यार्थी इस्तंबूल मार्गे विशेष विमानाने दिल्लीत सुरक्षित पोहचले आहेत.
पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनी हाती घेतला तिरंगा –
भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितलं की, काही पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनी देखील तिरंगा ध्वज हात घेऊन चेकपॉइंट्स पार केले. अशा परिस्थितीत भारताच्या तिरंगा ध्वजाने पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांची खूप मदत केली. हे विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज पकडून होते.
या युद्धात काल(मंगळवार) खार्कीव्ह शहरात झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे युक्रेनमधून परतण्यासाठी मदतीची याचना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपुढील संकट अधोरेखित झाले असून, देशापुढे वेगवान मदतकार्याचे आव्हान उभे ठाकले आह़े. युक्रेनमधून रोमानिया शहरात पोहोचलेल्या या भारतीय विद्यार्थ्यांना विशेष विमानाने भारतात आणले जात आहे. युक्रेनच्या शेजारील देशांमधून एअर इंडिया, स्पाइस जेट आणि इंडिगोची विमाने सातत्याने भारतात येत आहेत.