अल-काइदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा शोधण्यास सीआयएला मदत केल्याबद्दल पाकिस्तानातील लवादाने डॉ. शकील आफ्रिदी यांना दोषी ठरविले आहे. मात्र डॉ. आफ्रिदी यांना ठोठाविण्यात आलेल्या ३३ वर्षांच्या शिक्षेत लवादाने १० वर्षांची कपात केली आहे.
एफएटीए लवादाने आफ्रिदी यांना ३३ वर्षांची आणि तीन लाख २० हजार रुपये दंडाची शिक्षा २०१२ मध्ये ठोठावली होती. आफ्रिदीच्या वकिलांनी त्या शिक्षेला आव्हान दिले होते.
शनिवारी निकाल देताना एफसीआर आयुक्तांनी जुन्या आदेशाचे समर्थन केले, मात्र आफ्रिदी यांच्या शिक्षेत १० वर्षांनी कपात केली. हा निर्णय अनपेक्षित असून त्याविरुद्ध एफएटीए लवादापुढे याचिका केली जाईल, असे आफ्रिदी यांच्या वकिलांनी सांगितले.अमेरिकेच्या कमांडोंनी लादेन याला ठार केल्यानंतर लगेचच आफ्रिदी यांना अटक करण्यात आली होती. लष्कर-ए-इस्लामशी संबंध ठेवल्याने त्यांना दशद्रोहाबद्दल दोषी ठरविण्यात आले.

Story img Loader