अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रचंड हलकल्लोळाला अखेर पूर्णविराम मिळाला. अफगाणिस्तानमधील पूर्ण सत्ता आता तालिबान्यांच्या हाती आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी रविवारी संध्याकाळीच देश सोडून ताजिकिस्तानमध्ये गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण कोलाहलावर शांततेचं नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मलाला युसूफझईने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासाठी ते सारं बघणं प्रचंड धक्कादायक होतं, असं म्हणतानाच मलाला युसूफझईनं एक विनंती केली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत मलालाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

…आणि अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला!

अफगाणिस्तानमधून अमेरिकी फौजा माघारी परतल्यानंतर जे अपेक्षित होतं, तेच घडू लागल्याचं दिसू लागलं. तालिबाननं हळूहळू अफगाणिस्तानमधील एकेक प्रांत आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. अखेर रविवारी तालिबानी बंडखोरांनी काबूलमध्ये शिरकाव करत अफगाणिस्तानच्या राजभवनावर आपला हक्क प्रस्थापित केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला आणि आख्खा देश तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याचं स्पष्ट झालं. मात्र, हे पाहून तालिबान्यांच्या कट्टर भूमिकांचा विरोध करणारी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझई हिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा

मलाला म्हणते, “मला काळजी वाटते!”

२४ वर्षांच्या मलाला युसूफझईने या सगळ्या प्रकारावर प्रचंड धक्क्यात असल्याचं ट्वीट केलं आहे. “तालिबान अफगानिस्तानवर ताबा मिळवत असल्याचं बघून आम्हाला प्रचंड धक्का बसला. मी तिथल्या महिला, अल्पसंख्य आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांविषयी खूप चिंतेत आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक सत्तांनी अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालून युद्धबंदी करावी. अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी आणि नागरिकांना व निर्वासितांना संरक्षण द्यावं”, असं मलाला युसूफझईने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मलालाने देखील तालिबानशी दीर्घकाळ वैचारिक संघर्ष केला आहे. २०१२ मध्ये मलाला युसूफझईला पाकिस्तानातील तालिबानचा माजी प्रवक्ता एहसानुल्लाह एहसानने डोक्यात गोळी झाडली होती. त्यानंतर मलालाच्या संघर्षाला अधिक धार आली. २४ वर्षीय मलालाला २०१४ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. तिला नोबेल पुरस्कार देण्यात आले, त्यावेळी तिचं वय अवघं १७ वर्षे होतं.