रशिया युक्रेनदरम्यानचं युद्ध सुरू असून अनेक देशातील लोक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भारत ऑपरेशन गंगा राबवून नागरिकांना मायदेशी परत आणत आहे. दरम्यान, सुमी शहरातून अडकलेल्या नागरिकांना स्थलांतरीत करण्याचा पहिला टप्पा सुरू झाल्याची माहिती युक्रेन सरकारने मंगळवारी दिली. यात ६९४ भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, एका पाकिस्तानी मुलीनंही भारतीय दूतावासाचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानच्या अस्मा शफीकने तिला युक्रेनमधून बाहेर काढल्याबद्दल किव्हमधील भारतीय दूतावास आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतीय अधिकार्‍यांनी तिची सुटका केली आहे आणि देशाबाहेर काढले. लवकरच ती तिच्या कुटुंबाला भेटणार आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे. एएनआयने या मुलीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

सुमीमध्ये अडकलेल्या विद्यर्थ्यांची लवकरच सुटका होणार

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना वारंवार आग्रह करूनही सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग तयार झाला नसल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत याआधी भारताने चिंता व्यक्त केली होती. मात्र, मंगळवारी येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग दिसू लागल्याने सर्वानीच नि:श्वास सोडला. त्यांना लवकरच पोल्टावा येथे आणण्यात येईल. त्याबाबत प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani girl thanks pm modi indian embassy for evacuating her from war zone in ukraine hrc
Show comments