बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (बीएसएफ) राजस्थान सीमेवर एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. तो अजमेरला जात असताना बीएसएफकडून ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रिझवान अश्रफ असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाचे नाव आहे. हा व्यक्ती भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्याचा उद्देशाने आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाबाबत उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी

अटक करण्यात आलेला पाकिस्तानी नागरिक १६ जुलै रोजी राजस्थानमधील अजमेरला जात असताना श्रीगंगा नगर जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर बीएसएफच्या जवानांनी त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याच्याकडून बीएसएफने लांब चाकू आणि काही धार्मिक ग्रंथ जप्त केले.

हेही वाचा – “शिवसेना फोडण्यामागे शरद पवार, अजित पवार”; रामदास कदमांच्या आरोपाला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले…

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जगभरातून त्यांचा विरोध करण्यात आला होता. तसेच भारतातही त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.