भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना ठार मारण्याच्या उद्देशाने भारतात घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी नागरिक रिझवान अश्रफने धक्कादायक खुलासा केला आहेत. ”पाकिस्तानातील एक मौलवी टोळी तयार करत आहे. या टोळीला लोकांचे गळे कापण्यासाठी भारतात पाठवण्यात येणार आहे”, अशी माहिती त्याने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “आदित्य ठाकरे वाघच पण..,” शिंदे गटातील आमदार सुहास कांदेंची खोचक टीका

”पाकिस्तानातील एक मौलवी टोळी तयार करत आहे. या टोळीला लोकांचे गळे कापण्यासाठी भारतात पाठवत येणार आहे. साद हुसैन रिझवी असे पाकिस्तानात बसलेल्या मौलावीचे नाव असून तो तेहरीक-ए-लब्बैक पक्षाचा अध्यक्ष आहे. तसेच त्याने बनवलेल्या टोळीचे नाव बट-शिकान बटालियन टीएलपी (ई), असल्याची माहिती रिझवाने दिली आहे. तसेच हा मौलावी आपल्या भाषणात बोलताना स्वत:ला सर्वात मोठा दहशतवादी असल्याचे सांगतो, असेही तो म्हणाला. रिजवानही त्याच टोळीचा सदस्य आहे.

हेही वाचा – नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट आखला होता? तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

काही दिवसांपूर्वीच रिझवान अश्रफ याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (बीएसएफ) राजस्थान सीमेवर एका अटक केली होती. तो अजमेरला जात असताना बीएसएफकडून ही कारवाई करण्यात आली. तो भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्याचा उद्देशाने आला होता, असे त्यांनी बीएसएफला सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani infiltrator rizwan ashraf claims that maulana in pakistan preparing gang against india spb