Pakistan Viral Video : रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून यादरम्यान पाकिस्तानातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये मशिदीच्या बाहेर इफ्तारच्या वेळी मोफत मिळणारे अन्न घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोक धावपळ करताना दिसत आहेत. व्हायरल सोशल मीडिया पोस्टनुसार, ही घटना इस्लामाबादमधील शाह फैसल मशिदीत घडली.
मशिदीच्या परिसरता प्लेट लावून ठेवल्या आहेत आणि पारंपरिक वेशात असलेले पुरुष अन्नाकडे धावत जाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ एका पाकिस्तानी पत्रकाराने पोस्ट केला आहे. त्याने याबरोबर लिहिले आहे की, “हा काही मागास भाग नाही, हा पाकिस्तानातील सर्वात विकसित भागांपैकी इस्लामाबाद येथील फैसल मशीद आहे. मोफत इफ्तारची घोषणा करण्यात आली आणि उताविळ पाकिस्तानी (भिकारी नव्हे तर सामान्य लोक) त्यांच्या वाट्याचे जेवण घेण्यासाठी धावत आङेत. न्यूक्लिअर पॉवर असलेल्या देशातली पाकिस्तानी लोकांची ही परिस्थिती आहे.”
नेटकऱ्यांची सडकून टीका
या व्हारल व्हिडीओनंतर पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणि देशात्या प्रायोरिटी या मुद्द्यांवर जोरदार टीका केली जात आहे. पाकिस्तान सध्या सामोरा जात असलेल्या आर्थिक संकटाच्या मुद्द्यावर अनेकांनी खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कोणत्या तारखेचा आहे याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. या व्हिडीओवर सोशल मीडीयावर भरभरून कमेंट्स येताना दिसत आहे.
तरीही ते आघाडीची आर्थिक महाशक्ती असल्याबद्दल कसे काय बोलू शकतात, असे एका वापरकर्त्याने सुनावले आहे. जागतिक बँक आणि चीनचे कर्ज हे फार उपयोगी ठरत नसल्याचा हा पुरवा आहे असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.
“यावरून दिसून येतं की पाकिस्तान कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे, लवकरच ते स्वतःच फुटतील कारण त्यांनी स्वतःच्या माजी पंतप्रधानांना तुरुंगात टाकले आहे,” असे एका वापरकर्त्याने म्हटले. तर एका वापरकर्त्याने कमेंट करत फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेशात झालेल्या या ग्लोबव इनव्हेस्टर समिटमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेची आठवण करून दिली आहे