भारतभर होलिका दहन तसेच धूलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या रंगांची उधळन करुन हा सण फक्त भारतच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. आपला शेजारील देश म्हणजेच पाकिस्तानमध्येही या सणानिमित्ताने हर्षोल्हासाचे वातावरण असते. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील हिंदू बांधवांना होळी तसेच रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“होळी या रंगांच्या सणानिमित्त पाकिस्तानमधील सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा,” असं इम्रान खान यांनी म्हटलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील समस्त भारतीयांनी होळीच्या सुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी “तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. एकमेकांप्रतीचे प्रेम, जिव्हाळा यांचं प्रतिक असेलेला हा रंगोत्सव तुमच्या जीवनात आनंदाचा प्रत्येक रंग घेऊन येवो,” असं मोदींनी म्हटलंय.
दरम्यान, होळी तसेच धूलीवंदन हा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच. संपूर्ण देशात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. धूलीवंदनानिमित्त वेगवेगळे रंग उधळत मनसोक्त आनंद लुटला जातो. आपले मित्र, स्नेही, तसेच परिवारासोबत राहून आनंद द्विगुणित करण्याचा हा सण आहे. असे असले तरी रंग खेळताना कोणाला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच रंग खेळताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याचीदेखील काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.