अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाब यांना मंगळवारी कराची पोलिसांनी माराहाण केल्याची घटना घडली. सूत्रांच्या माहितीनूसार चाँद नवाब हे पाकिस्तानमधील कँट रेल्वेस्थानकात सुरू असणाऱ्या तिकीटविक्रीच्या गैरव्यवहाराचे वृत्तांकन करत होते. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी चाँद नवाब यांना मारहाण केली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. खुद्द अभिनेता सलमान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कबीर खान यांनी फोनवरून चाँद नवाब यांच्या तब्येतीची चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल ९२ वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलेले चाँद नवाब हे मध्यंतरी  ईदनिमित्त केलेल्या वृत्तांकनाच्या एका व्हिडिओमुळे सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर चाँद नवाबच्या प्रत्यक्ष आयुष्यापासून ‘प्रेरणा’ घेऊन अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याने ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती.

Story img Loader