पबजी खेळता खेळता प्रेमप्रकरण झाल्याचे अनेक किस्से लॉकडाऊननंतर समोर आले. परंतु, सध्या गाजत असलेले प्रकरण म्हणजे सीमा हैदर आणि सचिन मीना यांचं प्रकरण. कारण, पबजीवर भेटलेल्या आपल्या प्रियकारासाठी सीमा हैदर चक्क तीन देशांतून अवैध प्रवास करत आपल्या चार मुलांना घेऊन भारतात दाखल झाली आहे. त्यांच्या या प्रेमाची कहानी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याने त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायला नेटिझन्सना आवडतंय.

सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्यात कशी झाली ओळख?

सीमा हैदर मुळची पाकिस्तानची असून तिला चार मुलं आहेत. तर सचिन मीना हा ग्रेटर नोएडा येथे राहणारा आहे. जागरण या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांची भेट २०१९ मध्ये म्हणजेच कोरोनाकाळात झाली. दोघांनाही पबजी खेळण्याचं वेड होतं. पबजी खेळता खेळता दोघांमध्ये ओळख वाढली. त्यामुळे ते ऑनलाईन अॅपवर तासन् तास गप्पा मारत राहायचे. चार महिने गप्पा मारून झाल्यावर दोघांनी एकमेकांचा नंबर शेअर केला. त्यानंतर, दोघांमध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरुपात गप्पा होऊ लागल्या.

kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Premachi Goshta Fame Rajas Sule Got to married photos viral
शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये
love became mistake chatura
आयुष्याची घडी विस्कटवणारी वादळवाट…
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Allu Arjun Emotional
Allu Arjun : “फायर नहीं वाईल्ड फायर…” म्हणणारा ‘पुष्पा’ जेव्हा भावूक होतो, ‘त्या’ घटनेचा उल्लेख करताच अल्लू अर्जुनचा कंठ दाटला
Eijaz Khan addresses controversy with Pavitra Punia
अभिनेता एजाज खानने धर्मांतरासाठी एक्स गर्लफ्रेंडवर दबाव टाकण्याच्या आरोपांवर दिलं उत्तर, म्हणाला…
arjun kapoor on parents divorced
“आई वडिलांच्या घटस्फोटामुळे माझ्या अभ्यासावर…”, अर्जुन कपूर झाला व्यक्त; म्हणाला, “मी शिक्षणातून…”

सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्यात कशी झाली ओळख?

सीमा हैदर मुळची पाकिस्तानची असून तिला चार मुलं आहेत. तर सचिन मीना हा ग्रेटर नोएडा येथे राहणारा आहे. जागरण या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांची भेट २०१९ मध्ये म्हणजेच कोरोनाकाळात झाली. दोघांनाही पबजी खेळण्याचं वेड होतं. पबजी खेळता खेळता दोघांमध्ये ओळख वाढली. त्यामुळे ते ऑनलाईन अॅपवर तासन् तास गप्पा मारत राहायचे. चार महिने गप्पा मारून झाल्यावर दोघांनी एकमेकांचा नंबर शेअर केला. त्यानंतर, दोघांमध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरुपात गप्पा होऊ लागल्या.

गदर चित्रपटातून घेतली प्रेरणा

जानेवारी २०२१ मध्ये दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. गदर या चित्रपटातून त्यांनी प्रेरणा घेतली असल्याचं बोललं जातंय. गदर चित्रपटातही भारतीय प्रियकर आणि पाकिस्तानी प्रेयसी यांच्या प्रेमातील संघर्ष दाखवण्यात आला आहे.

बेकायदा प्रवेश आणि वास्तव्य यामुळे झाली शिक्षा

दरम्यान, ४ जुलै रोजी सीमा हैदर तिच्या चार मुलांना घेऊन नेपाळमार्गे भारतात आली. तिच्याकडे भारतात प्रवास करण्याचा किंवा भारतात राहण्यासाठी कोणताही व्हिजा नव्हता. नेपाळमार्गे अवैधरित्या तिने भारतात प्रवेश केला. तिने भारतात बेकायदा वास्तव्य केल्याने तिच्यासह सचिनलाही अटक करण्यात आली.

मार्चमध्येच झालं होतं लग्न

एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, मार्च महिन्यांतच त्यांचं लग्न झालं आहे. काठमांडूच्या पशुपतिनाथ मंदिरात जाऊन हिंदू प्रथा परंपरेप्रमाणे लग्न केल्याचं तिने मान्य केलं.

वकिलांच्या तक्रारीमुळे बाब आली उजेडात

सीमाकडे व्हिसा नसल्याचं लक्षात आल्यानंतर एका वकिलाने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुनच पोलिसांनी सीमा, सचिन आणि त्याच्या वडीलांना अटक केली असून १४ दिवसांच्या कोठडीनंतर तिघांनाही आता जामीन मिळाला आहे.

अनोखी प्रेमकहाणी का?

सीमा आणि सचिन यांच्या वयातही अंतर असल्याचं सांगण्यात येतंय. सीमाचं वय ३० तर सचिनचं वय २२ आहे. तसंच, सीमाचं आधीच लग्न झालं असून तिला चार मुलं आहेत. तरीही या दोघांचं सूत जुळलं. त्यामुळे त्यांचं हे प्रेम मान्य करावं अशी मागणी सचिनच्या गावकऱ्यांनी केली आहे.

सीमा हैदर म्हणते मी गुप्तहेर नाही

सचिन आणि सीमाचं हे प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर सीमावर गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘इंडिया टुडे’शी बोलताना पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने ती गुप्तहेर असल्याचे आरोप फेटाळले आहेत. ती म्हणाली, “असं काहीही नाही, अखेर सत्य बाहेर येईल. शिवाय असे असते तर मी माझ्या निरागस मुलांसोबत नाही तर एकटीच भारतात आली असते.” सीमाला तिच्या इंग्रजी बोलण्याबाबत प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले, “मी फक्त पाचवीपर्यंत शिकली आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करून कोणीही हे करू शकते. मला इंग्रजीचे काही शब्दही बोलता येत नाहीत आणि मला संगणक कसा चालवायचा हे देखील माहित नाही.”

सीमाच्या पहिल्या पतीची मोंदीकडे विनंती

सीमा यांचे पती गुलाम हैदर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली असून, “त्यांची पत्नी आणि चार मुलांना पाकिस्तानात परत पाठवा”, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या व्यक्तीने व्हिडीओ बनवून भारत सरकारला हे आवाहन केले.

गदर चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडून कौतुक

दरम्यान, सीमाच्या या प्रेमकहाणीवर ‘गदर’ व ‘गदर २’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल म्हणाले, “प्रेमाला कोणतीही सीमा नसते. माझ्या गदर चित्रपटाची कथाही यावरच आधारित आहे. मी सीमाची कहाणी ऐकली, ती मुलगी इतकी धाडसी आहे की न घाबरता तिच्या प्रियकराला भेटायला भारतात आली आहे. तिचा प्रियकरही तिला तिच्या मुलांसोबत स्वीकारायला तयार आहे. एवढा लांबचा प्रवास करून ती इथपर्यंत पोहोचली आहे, तिचे स्वागतच करायला हवे. त्यांचे प्रेम टिकून राहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

पोलिसांना धमकीचा फोन

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील वाद अवघ्या जगाला माहितेय. त्यातच, पाकिस्तानी महिला भारतीय तरुणासाठी देश सोडून गेल्याने पाकिस्तानच्या लोकांनी संताप व्यक्त केलाय. सीमाला पुन्हा पाकिस्तानात पाठवा अन्यथा, मुंबईत २६/११ सारखा हल्ला करू असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला होता. उर्दू भाषिक एका व्यक्तीने हा फोन केला होता.

पाकिस्तानात मंदिरावर रॉकेट लॉन्चरने हल्ला

पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतातील एका हिंदू मंदिरावर रविवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीने रॉकेट लॉन्चरचा वापर करून हल्ला केला, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानातील सीमा हैदर जाखरानी या महिलेचे हिंदू पुरुषाबरोबरचे प्रेमप्रकरण उघडकीस आल्यानंतर काशमोरा आणि घोत्की खोऱ्यातील दरोडेखोरांनी त्याचा बदला घेण्यासाठी हिंदू मंदिरांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी हा हल्ला झाला आहे. काशमोरा भागातील या छोटेखानी हिंदू मंदिरावर हल्ला चढवताना दरोडेखोरांनी आसपासच्या हिंदूंच्या घरांचेही नुकसान केले. स्थानिक हिंदू समुदायाने उभारलेल्या या मंदिरावर बेछूट गोळीबार करण्यात आला. ही माहिती समजताच काशमोर-कांधकोटचे एसएसपी इरफान सामो यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पथक तेथे दाखल झाले. त्यानंतर आठ ते नऊ हल्लेखोरांनी पळ काढला. हल्ला झाला त्या वेळी हे मंदिर बंद होते. हे मंदिर बागरी समाजाच्या वार्षिक उत्सवाच्या वेळी उघडले जाते.

उत्तर प्रदेश सरकारकडून एटीएस स्थापन

या दोघांच्या प्रेमप्रकरणाला त्यांच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी स्वीकारलं असलं तरीही भारताच्या दृष्टीने हा धोका आहे. कायदा सुव्यवस्था राखली जावी, याकरता उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याकरता एटीएस (Anti Terrorism Squad) समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Story img Loader