जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करून भारतीय लष्करातील एका अधिकाऱयाची हत्या केली. नियंत्रण रेषेजवळ दोन भारतीय जवानांची हत्या करून त्यापैकी एकाचे शिर कापून नेण्याची घटना ताजी असतानाच पाकिस्तानी सैन्याच्या या नव्या कृत्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. 
हत्या करण्यात आलेल्या लष्करी अधिकाऱयाने नाव अद्याप समजलेले नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नवाझ शरीफ आरुढ झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, नियंत्रण रेषेजवळील या कृत्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Story img Loader