पाकिस्तानी लेखक नुसरत मिर्झा यांनी एका मुलाखतीदरम्यान काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी भारत भेटीदरम्यान गोळा केली माहिती पाकिस्तानी गुत्पचर संस्था आयएसआयला पुरवली असल्याचा गौप्यस्फोट मिर्झा यांनी केला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने त्याचा योग्य तो वापर केला नाही, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानी पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शकिल चौधरी यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत मिर्झा यांनी ही माहिती उघड केली आहे. ”माझ्या भारत भेटीदरम्यान मला पाकिस्तान सरकारच्या विदेश मंत्रालयाकडून अनेक फायदे मिळाले. त्याबदल्यात मी आयएसआयला भारतातून गोळा केलेली माहिती पुरवली. खरं तर तुम्ही भारतात जाण्यासाठी जेव्हा व्हिसा घेता, तेंव्हा तुम्हाला केवळ तीन ठिकाणी फिरण्याची परवानगी मिळते. मात्र, खुर्शीद कसुरी विदेश मंत्री असताना मला सात ठिकाणी फिरण्याची परवानगी मिळाली होती”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – ‘कांजूरमार्ग कारशेड एकापेक्षा जास्त मेट्रोसाठी वापरणे व्यवहार्य नाही’, सोमैयांनी ट्वीट केले गृहनिर्माण मंत्रालयाचे ‘ते’ पत्र

पुढे बोलताना ते म्हणाले, ”मी अनेकदा भारतात जाऊन आलो आहे. मला हमीद अन्सारी राष्ट्रपती असताना आमंत्रित करण्यात आले होते. मी भारताला पाच वेळा भेट दिली. मी दिल्ली, बंगळूरू, चेन्नई, पाटना, कोलकाता अशा अनेक शहरांमध्ये जाऊन आलो. २०११ मध्ये दिल्ली अल्पसंख्याक कमिशनच्या अध्यक्षाचीही मी भेट घेतली.”

”भारत भेटीदरम्यान, गोळी केलेली माहिती मी खुर्शीद यांना दिली होती. त्यांनी ती माहिती पाकिस्तानी आर्मी प्रमुखांना दिली. त्यानंतर आर्मी चीफ यांनी मला आणखी माहिती गोळा करण्याची विनंती केली होती”, असा खुलासाही त्यांनी केला.

”मी भारताची संस्कृती तसेच भारताच्या कमजोरीचा अभ्यास केला होता. यासोबतच भारत देश म्हणून कशाप्रकारे काम करतो. भारतात मुस्लीम कशा प्रकारे जगतात, काश्मीमध्ये कशा प्रकारे अलगवादी चळवळ चालते. आदी माहिती मी गोळा केली होती. तसेच अनेक न्यूज चॅनलचे संपादक आणि मालकांशीही माझी मैत्री होती. एकंदरितच भारत सरकारला घेरण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती मी आयएसआयला दिली होती. मात्र, पाकिस्तानी नेतृत्वाने या माहितीची योग्य तो वापर केला नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “..अब सभी को सभी से खतरा है”, संजय राऊतांचं सूचक ट्वीट; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना केलं टॅग!