जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईद यांने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे दंगे सुरू आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, अशा स्वरूपाचे प्रक्षोभक भाषण हाफिज सईदने लाहोरमधल्या एका सभेत केले.
‘काश्मिरी जनात आता रस्त्यावर उतरली आहे. त्यांनी सुरू केलेल्या या बंडखोरीने भविष्यात चळवळीचे रूप घेतले पाहिजे. काश्मीरमधल्या सगळ्या छोट्या मोठ्या गटाने एकत्र येण्याची वेळ आता आली आहे. हुरियतच्या सगळ्या छोट्या मोठ्या गटाने एकजूट झाले पाहिजे. गेल्या काही दिवसांत काश्मीरमधल्या दंग्यात जितके लोक मारले गेलेत. त्यांच्या प्राणांची आहुती वाया जाऊ देऊ नका’ असे हाफिज सईदने सभेमध्ये म्हटले आहे.
‘काश्मिरमधल्या लोकांचे जे विचार आहेत तेच आपलेसुद्धा आहेत. आपण जर यांना पाठिंबा दिला तर लवकरच काश्मीर पाकिस्तानाचा एक भाग होईल, ही चळवळ आता राष्ट्रीय पातळीवर नेली पाहिजे आणि पाकिस्तान सरकारला देखील यात लक्ष घालायला भाग पाडले पाहिजे अशीही गरळ त्याने सभेमध्ये जमलेल्या जनतेसमोर ओकली.
हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान मुज्जफर वाणी याला भारतीय सैन्याने ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अधिकच चिघळली आहे. या दंग्यात आतापर्यंत ३० लोकांचा मृत्यू झाला तर कित्येक जण जखमी झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा