बलुचिस्तानचे राष्ट्रवादी नेते नवाब अकबर खान बुगटी यांच्या हत्येप्रकरणी दहशतवाद विरोधी न्यायालयाने पाकिस्तानचे माजी लष्करशाह व अध्यक्ष परवेझ मुशर्रफ व इतर दोन जणांना दोषमुक्त केले आहे.
बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील न्यायालयाने माजी अध्यक्ष मुशर्रफ यांची सुटका करतानाच राज्याचे माजी गृहमंत्री मीर शोएब नोशेरवानी व कौमी वतन पार्टी प्रमुख अफताब अहमद खान शेरपाव यांनाही दोषमुक्त ठरवण्यात आले आहे. न्या. जनमहंमद गोहर यांनी निकाल जाहीर केल्यानंतर बुगटी यांचे पुत्र जमील बुगटी व सोहेल रजपूत यांच्या वकिलांनी या निकालावर आव्हान देण्याचे जाहीर केले असे ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
रजपूत यांनी सांगितले, की आरोपींना दोषी ठरवणे आवश्यक होते. आम्ही या निकालावर समाधानी नाही, त्यामुळे निकालास आव्हान देणार आहोत. जानेवारी २०१५ मध्ये मुशर्रफ यांच्यावर या प्रकरणी आरोपपत्र ठेवण्यात आले होते.
हत्या प्रकरणात माजी अध्यक्ष मुशर्रफ दोषमुक्त
पाकिस्तानचे माजी लष्करशाह व अध्यक्ष परवेझ मुशर्रफ व इतर दोन जणांना दोषमुक्त केले आहे.
First published on: 19-01-2016 at 02:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistans ex president musharraf acquitted in murder case