मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर नव्या सरकारने सोमवारी पहिलं विधानसभा विशेष अधिवेशन आयोजित केलं होतं. यावेळी सदनात असलेला पंडित जवाहरलाल नेहरु यांचं तैलचित्र हटवण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीमागे दोन तैलचित्रं होती त्यातला एक महात्मा गांधींचा होतं आणि दुसरं पंडित नेहरुंचं तैलचित्र होतं.त्यातील पंडित नेहरुंचं तैलचित्र हटवण्यात आलं आहे.ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने भाजपाव आरोप केला आहे.

काँग्रेसचा भाजपावर आरोप

मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडल्यानंतर काँग्रेसने आता हा आरोप केला आहे की भाजपाला देशाचा इतिहास पुसून टाकायचा आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारची कृती करत आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसचे पक्ष प्रवक्ते अब्बास हाफीज यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर पोस्ट लिहिली आहे. त्यावर त्यांनी मध्य प्रदेश विधानसभेतून पंडित नेहरु यांचं तैलचित्र हटवल्याचा निषेध नोंदवला आहे.

ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”

काय म्हणाले अब्बास हफीज?

अब्बास हफीज म्हणाले आहे की देशाचं हे दुर्दैव आहे की भाजपा सत्तेत आहे. भाजपाने देशाचा इतिहास मिटवण्याची तयारी सुरु केली आहे. काही दशकांपूर्वी पंडित नेहरुंचं तैलचित्र विधानसभेत लावण्यात आले होते जे हटवण्यात आले. हे तैलचित्र हटवणं भाजपाची मानसिकता काय आहे ते दाखवणारी कृती आहे. दरम्यान पंडित नेहरुंचं तैलचित्र हटवून त्या जागी बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र लावण्यात आलं आहे.

पंडित नेहरुंचं तैलचित्र होतं त्याच जागी लावण्यात यावं नाहीतर आम्ही ते लावू असा इशाराही अब्बास हफीज यांनी दिला होता. मात्र हे चित्र पुन्हा विधानसभेत लावण्यात आलं नाही.

Story img Loader