भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ‘आदिवासी पत्नी’ अशी ओळख असलेल्या बुधनी मांझियाइन यांचं निधन झालं. त्यानंतर काही वर्षांपूर्वी घडलेली एक घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंडित नेहरुंच्या एका कृतीमुळे बुधनी मांझियाइन यांना आदिवासी समाजातून वाळीत टाकण्यात आलं होतं. आपण जाणून घेऊ काय होती ती घटना.

दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरु यांनी बुधनी मांझियाइन यांचा धनबादच्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या (डीव्हीसी पंचेत प्रकल्प) निर्मितीत मोठा वाटा होता. बुधनी यांच्या हस्ते दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरु यांनी डॅमचं उद्घाटन केलं आणि त्यांना हार घालून त्यांचा सन्मान केला. ज्यानंतर आदिवासी समाजाने बुधनी मांझियाइन यांना वाळीत टाकलं होतं. मात्र जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा बुधनी मांझियाइन यांना डीव्हीसी मध्ये नोकरी मिळाली होती. पंडित नेहरुंनी गळ्यात माळ घातल्याने बुधनी मांझियाइन यांना पंडित नेहरुंची आदिवासी पत्नी म्हटलं जाऊ लागलं.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
supriya sule News
Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे सरकारला नऊ प्रश्न; म्हणाल्या, “वाल्मिक कराड…”
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

काय होतं प्रकरण?

पंचेत डॅमचं उद्घाटन करण्यासाठी पंडित नेहरु आले होते तेव्हा त्यांना बुधनी मांझियाइन यांच्या योगदानाविषयी समजलं. त्यांचं योगदान ऐकून पंडित नेहरु भारावले. ज्यानंतर ६ डिसेंबर १९५९ या दिवशी बुधनी मांझियाइन स्विच ऑन करुन त्यांनी डॅमचं उद्घाटन केलं. तसंच बुधनी यांचा सन्मान म्हणून त्यांच्या गळ्यात माळही घातली. बिगर आदिवासी माणसाने (पंडित नेहरु) बुधनी यांच्या गळ्यात माळ घातल्याने आदिवासी समाजाने त्यांना बहिष्कृत केलं. याच बुधनी मांझियाइन यांचं निधन झालं आहे. ज्यानंतर ही ६४ वर्षांपूर्वीची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बुधनी यांचा सन्मान का करण्यात आला?

पंचेत प्रकल्पासाठी स्थानिक कामगार पुढे येत नव्हते. त्यावेळी बुधनी मांझियाइन यांनी रावण मांझी यांच्यासह पुढाकार घेतला. या दोघांनी पुढाकार घेतल्याने इतर मजूर या प्रकल्पासाठी काम करण्यास पुढे आले. ज्यानंतर या प्रकल्पाचं बांधकाम सुरु झालं. एका प्रकल्पाचं बांधकाम व्हावं म्हणून बुधनी मांझियाइन यांनी जो पुढाकार घेतला आणि लोकांना ज्या पद्धतीने समजावून सांगितलं त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला. त्यावेळी लोक बुधनी मांझियाइन यांची स्तुती करत होते. मात्र पंडित नेहरुंनी त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि आदिवासी समाजाने बुधनी मांझियाइन यांच्यावर बहिष्कार टाकला.

बुधनी मांझियाइन यांचं निधन १७ नोव्हेंबर रोजी झालं. पंडित नेहरु यांच्या आदिवासी पत्नी असं बिरुद लागलेल्या बुधनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक राजकारणी आणि नेते आले होते. बुधनी या त्यांची मुलगी रत्नाच्या घरी राहात होत्या.

नेमका काय होता तो प्रसंग?

पंचेत प्रकल्पासाठी ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं त्या बुधनी मांझियाइन या संथाल आदिवासी समाजाच्या होत्या. पंडित नेहरुंनी त्यांना प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी हार घातला. ही कृती संथाल आदिवासी समाजात लग्नच मानली जाते. अशात पंडित नेहरुंनी हार घातला याचाच अर्थ संथाल आदिवासी समाजाच्या बाहेरच्या पुरुषाने बुधनी यांना हार घातला त्यामुळे त्यांना या आदिवासी समाजाने बहिष्कृत केलं. पंडित नेहरु यांनी घातलेली माळ बुधनी यांच्यासाठी आयुष्यभरासाठी डोकेदुखी ठरली. कारण पंडित नेहरुंनी माळ घातल्याने बुधनी ही त्यांची आदिवासी पत्नी ठरली. समुदायाबाहेर लग्न केल्याने बुधनी मांझियाइन यांना समाजाने बहिष्कृत केलं. तसंच गावंबदीही केली. शुक्रवारी बुधनी यांचं निधन झाल्यानंतर इतिहासाच्या पानांमधली विस्मृतीत गेलेली ही कहाणी पुन्हा चर्चेत आली आहे. बुधनी यांचं स्मारक उभारलं जावं अशी मागणी आता केली जाते आहे.

Story img Loader