पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच पंजापचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मोठी घोषणा केलीय. पंजाबमधील २ किलोवॅटपर्यंत वीज वापर असणाऱ्या कुटुंबांचं वीजबिल माफ केलं जाणार आहे. हे वीज बिल पंजाब राज्य सरकार भरणार आहे. याचा जवळपास ५३ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी सरकारला जवळपास १२०० कोटी रुपयांचं वीज बिल भरावं लागेल. याशिवाय वीज बिल न भरल्यानं तोडण्यात आलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चरणजीत सिंग चन्नी म्हणाले, “मी नेहमीच पंजाबमधील गावांमध्ये जात असतो. या भागात वीजेचा प्रश्न मुख्य आहे. ५३ लाख कुटुंबांना आपलं वीज बिल भरता आलेलं नाही. अधिकचे बिलं न भरल्यानं अनेक घरांमधील वीज मीटरची जोडणी तोडण्यात आलीय. मी त्यांची अडचण समजू शकतो आणि ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे पंजाब सरकार या ५३ लाख कुटुंबांचं वीज बिल भरेल. यातील ७५ ते ८० टक्के वीज ग्राहक २ किलोवॅट वर्गातील आहेत. वीज जोडणी तोडलेल्या ठिकाणी पुन्हा वीज जोडणी दिली जाईल. तसेच त्यांच्या शेवटच्या वीज बिलाची काळजी आम्ही घेऊ.”

“नवज्योत सिंग सिद्धू यांना पक्ष सर्वोच्च असल्याचं सांगितलं”

यावेळी चरणजीत सिंग चन्नी यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “जो कुणी पक्षाचा अध्यक्ष असतो तो कुटुंबाचा प्रमुख असतो. मी नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतली आणि पक्ष सर्वोच्च असल्याचं सांगितलं. मी त्यांना फोन करुन भेटून चर्चा करण्याविषयी आणि हा विषय सोडवण्याबाबत चर्चा केली.”

चन्नींच्या मंत्रिमंडळात भ्रष्ट नेत्यांना स्थान, भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग : केजरीवाल

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर आहेत. त्यांनी मोहालीत बोलताना मुख्यमंत्री चन्नी यांच्या मंत्रिमंडळात भ्रष्ट नेत्यांना जागा देण्यात आल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्याच्या निमित्ताने मी चन्नी यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांना स्थान देण्यात आलंय. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग देण्यात आल्यात. मी या सर्वांना बडतर्फ करण्याची मागणी करतो.”