पंजाब येथील अमृतसरमधील एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका ट्रॅव्हल एजंटने आपल्या बहिणीला ओमानमधील एका शेखला विकलं आहे. पीडित महिलेनं परदेशात अनेक दिवस अत्याचार सहन केल्यानंतर स्वत:ची सुटका करून घेतली आहे. भारतात परतल्यानंतर तिने तिच्याबरोबर घडलेल्या क्रूरतेचा खुलासा केला आहे.

प्रीत कौर उर्फ पिंकी असं नराधम ट्रॅव्हल एजंट भावाचं नाव आहे. तो मूळचा पंजाबमधील अमृतसर येथील छोटा रैयीआ येथील रहिवासी आहे. सध्या तो ओमानमध्ये वास्तव्याला आहे. आरोपी ट्रॅव्हल एजंटने आपल्या मावशीच्या मुलीला ओमानमध्ये चांगली नोकरी आणि बक्कळ पैसा मिळेल, असं आमिष दाखवलं होतं. सुरुवातीला पीडितेनं परदेशात जाण्यास नकार दिला. मात्र, आरोपीनं तिला सातत्याने नोकरी किती चांगली आहे? ओमानमध्ये गेल्यास आयुष्य कसं सुंदर बनेल? असं पटवून देण्याचा प्रयत्न केला. अखेर पीडित महिला ओमानला जाण्यास तयार झाल्यानंतर आरोपीनं तिला ४० हजार रुपयांची जुळवाजुळव करण्यास सांगितली. अर्धी रक्कम भारतात आणि उर्वरित अर्धी रक्कम ओमानमध्ये देण्यास सांगितलं.

पीडित महिला २६ एप्रिल २०२३ रोजी शारजाह विमानतळावर पोहोचली. तिथे एक पुरुष आणि एका महिलेनं तिचं स्वागत केलं. तिला एका घरात नेलं. पीडितेचा पासपोर्टही जमा करून घेतला. तिला एका घरात डांबून ठेवलं, इथे इतरही अनेक महिला होत्या. ज्यांना भुकेनं ग्रासलं होतं, त्यांनी भारतात परतण्याची आशा गमावली होती.

हेही वाचा- खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंगचा गोळ्या घालून खून

दरम्यान, अपहरणकर्त्यांनी तिला इंग्रजीत लिहिलेल्या एका करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितली. पण पीडितेला इंग्रजी भाषा ज्ञात नसल्याने तिने संबंधित करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपी शेखांनी तिला पाच दिवस अन्न-पाण्याविना एका पायावर उभं राहण्याची शिक्षा दिली. मात्र काही तासांनंतर ती कोसळली. यानंतर, नराधमांनी तिला एक व्हिडीओ बनवण्यास भाग पाडलं. ज्यामध्ये तिला सांगावं लागलं की, “मी स्वतःहून ओमानला आले आहे. मी इथे दोन वर्षे पूर्ण करण्यापूर्वी भारतात परत आले तर माझ्या मालकाला दीड लाख रुपये द्यावे लागतील”. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना पीडितेने सांगितलं की, “मीही तशाप्रकारे व्हिडीओ बनवला कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी व्हिडीओ बनवला नसता तर माझा शारीरिक छळ झाला असता.”

हेही वाचा- VIDEO : मॉलमधल्या रेस्तराँमध्ये सर्व्हिस चार्जवरुन कर्मचारी आणि ग्राहकांचा वाद, बाऊन्सर्सकडून मारहाण

व्हिडीओ शूट केल्यानंतर पीडितेला ओमानला पाठवलं. जेथे पंजाब, बंगाल, नेपाळ आणि इतर ठिकाणांहून सुमारे २०० मुलींना कैद करून ठेवण्यात आलं होतं. पीडितेनं पुढे सांगितलं की, अपहरणकर्ते आरोपी प्रामुख्याने शेख आहेत. ते भारतीय ट्रॅव्हल एजंट्सशी संगनमत करतात आणि अडचणीत सापडलेल्या गरजू मुलींना जाळ्यात अडकवतात आणि त्यांना वस्तूप्रमाणे वागणूक देतात. भाजी मंडईतून भाजी खरेदी करावी, अशाप्रकारे ते मुलींची खरेदी करतात. अपहरणकर्ते सर्व महिलांना रांगेत उभं करतात आणि शेख त्यांना भाजी मंडईतून गाजर-मुळा खरेदी केल्याप्रमाणे निवडतात.

हेही वाचा- धक्कादायक: MPSC उत्तीर्ण केलेल्या दर्शना पवारचा राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह

आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर पीडितेनं भारतीय दूतावासाकडे मदत मागितली आणि मदतीसाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर, ती एका गुरुद्वारात गेली जिथे तिची खासदार विक्रमजीत साहनी यांच्याशी भेट झाली. साहनी यांनी पीडितेला आणि इतर काही महिलांना त्यांचा पासपोर्ट परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पीडित महिला २ जून रोजी भारतात परतली असून तिने आपला भाऊ प्रीत कौर उर्फ पिंकीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Story img Loader