राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. नवीन महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात न्यायालयाने हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात आधी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागायला हवी होती, तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात आलात. आधी उच्च न्यायालयाला या प्रकरणी तपासणी करू द्या, नंतर आम्ही विचार करू.
न्या. ए.एम. सप्रे व न्या. अशोक भूषण यांच्यापुढे पंकज भुजबळ यांच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात एका सह आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे, त्याच धर्तीवर पंकज यांच्यावरील अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती द्यावी.
त्यावर न्यायालयाने सांगितले की, येथे एका आरोपीला दिलासा मिळाला म्हणून तुम्हीही सर्वोच्च न्यायालयात येण्याचे कारण नव्हते. आम्ही फाइल्स व आरोप बघितले आहेत. ज्या आरोपीला दिलासा दिला होता त्याने आधी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. जर तो उच्च न्यायालयात जाऊ शकतो तर तुम्ही का नाही. पंकज यांना याचिका मागे घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा