अण्णाद्रमुक पक्षाच्या माजी सर्वेसर्वा जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम एकदिवसीय उपोषणाला बसले आहेत. तामिळनाडू, पुद्दूचेरी आणि कराईकल याठिकाणीही पनीरसेल्वम यांचे समर्थक उपोषणाला बसणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता या उपोषणाला सुरूवात झाली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. अण्णाद्रमुक पक्षातचे पनीरसेल्वम यांचे समर्थक खासदार आणि आमदार या उपोषणात सहभागी झाले आहेत. चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात ७५ दिवसांच्या उपचारानंतर ५ डिसेंबरला जयललिता यांचे निधन झाले होते. या दरम्यानच्या काळात जयलिलता यांच्या प्रकृतीविषयी कोणालाही फारशी माहिती देण्यात येत नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे पनीरसेल्वम यांच्यासह अनेकांनी अम्मांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत याप्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. अपोलो रुग्णालयाच्या अहवालात म्हटले होते, की जयललिता यांच्या मृत्यूस अनेक घटक कारणीभूत ठरले, त्यांना अनेक वैद्यकीय समस्या होत्या. अपोलो रुग्णालयाने केलेले उपचार व एम्स रुग्णालयाचा अहवाल यातील माहिती राज्य सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते. जयललिता यांना सर्वोत्तम औषधे व उपचार देण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अनेक वैद्यकीय समस्या होत्या. ५ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ११.३० वाजता जयललिता यांचे निधन झाले होते.
जयललितांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पनीरसेल्वम यांचे उपोषण
५ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ११.३० वाजता जयललिता यांचे निधन झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-03-2017 at 14:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panneerselvam leads hunger strike demanding probe into jayalalithaa death