सोल : ऑस्कर विजेता चित्रपट ‘पॅरासाइट’मधील दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता ली-सून-क्यून (वय ४८) याचा मृत्यू झाला आहे. सोल येथे एका कारमध्ये ली-सून-क्यून बुधवारी मृतावस्थेत आढळून आला.  धक्कादायक बाब म्हणजे लीची कथित ड्रग्सच्या वापराबद्दल चौकशी सुरू आहे.

उत्तर सोलमधील रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये पोलीस आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांना ली बेशुद्ध अवस्थेत सापडला. तो मरण पावला असल्याचे आपत्कालीन अधिकाऱ्यांनी नंतर जाहीर केले. तत्पूर्वी ली बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेणे सुरू होते, असे  सेओंगबक पोलिसांनी सांगितले. लीचा मृतदेह नंतर जवळच्या सोल रुग्णालयात नेण्यात आला.

Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
An attempt by the accused in the Bopdev Ghat case to mislead the police Pune news
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
sucide pod controversy
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?
death of a boy, Pimpri, case registered doctors,
पिंपरी : चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरसह दोन परिचारिकांवर गुन्हा

हेही वाचा >>> चेन्नईतील खतनिर्मिती प्रकल्पातून वायूगळती; अनेक जणांना बाधा

लीने एका बार होस्टेसच्या निवासस्थानी बेकायदा ड्रग्ज घेतल्याच्या आरोपांबाबत त्याची पोलीस चौकशी सुरू होती. त्याला ड्रग्ज प्रकरणात अडकविण्यात आले आहे. तो काय ड्रग घेत आहे हे त्याला माहीत नव्हते, असे लीने आपल्या बचावात म्हटले होते, असे योनहॅप वृत्तसंस्थेने म्हटले आहे.२०२० मध्ये ‘पॅरासाइट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अन्य तीन विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटात लीने एका श्रीमंत कुटुंब प्रमुखाची भूमिका साकारली होती.