Parmar Couple Suicide Case : मध्य प्रदशातील सिहोर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एका दाम्प्त्याने आत्महत्या केली. मनोज परमार आणि त्यांची पत्नी नेहा परमार असं मृतांची नावे असं ते त्यांच्या आष्टा येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळले. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे हे जोडपं तणावाखाली होतं, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलाय. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ईडीने ५ डिसेंबर रोजी परमार यांच्या चार मालमत्तांवर छापे टाकले होते. छाप्यांदरम्यान अधिकाऱ्यांनी अनेक जंगम मालमलत्तांची संबंधित कागदपत्रे जप्त केली आणि ३.५ लाख रुपयांची बँक रक्कम गोठवली. परमार यांना एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या कथित ६ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून त्यातील मजकूर पोलिसांनी अद्याप उघड केलेला नाही.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, राहुल गांधींना एका चिमुकल्याने त्याच्या पिगी बँकेतील रक्कम देऊ केलेली. या जोडप्यांचाच हा मुलगा आहे. तेव्हापासूनच भाजपाने त्यांना लक्ष्य केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय.
The tragic death of Manoj Parmar, a dedicated Congress worker, and his wife from Sehore, Madhya Pradesh is heart-wrenching!
— Navajyoti Patnaik (@NavjyotiPatnaik) December 13, 2024
His children even donated their piggy bank to Rahul Gandhi ji during the Bharat Jodo Yatra.
He was reportedly harassed by the ED for days, pushing his… pic.twitter.com/V8FD4DZk8W
परमार यांच्या मृत्यूमागे ईडीचा दबाव
परमार यांच्या कुटुबीयांच्या म्हणण्यांनुसार या जोडप्याच्या मृत्यूमध्ये ईडीच्या दबावाचा मोठा वाटा आहे. परमार यांच्या भावाने स्थानिक माध्यमांना सांगितलं की, ईडीच्या कारवाईमुळे आणि सध्या सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईमुळे हा व्यावसायिक मानसिक तणावाखाली होता.
सीहोरचे माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कैलाश परमार यांनी सांगितलं की, मनोजचा मुलगा पिग्गी बँक संघाचे आयोजन करून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाटी सक्रियपणे सहभागी होता. तसंच, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यानीही सोशल मीडियावर ईडीने परमार यांना विनाकारण त्रास दिल्याचा आरोप केला आहे.