CCTV Camera in Girls Bedroom : मुलांनी अभ्यासाच्या नावाखाली टाईमपास करू नये, त्यांनी सातत्याने अभ्यास करावा, परीक्षेत चांगले गुण मिळवावेत या आशेपोटी अनेक पालक आपल्या पाल्यांवर करडी नजर ठेवतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. रेडिटवर एका १६ वर्षीय मुलीने तिच्या पालकांनी कशाप्रकारे लक्ष ठेवलं याची कहाणी सांगितली आहे. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर तिने ही पोस्ट डिलिट केली.

आयआयटी-जेईईची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय मुलीच्या बेडरुममध्ये तिच्या आईवडिलांनी सात महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. तिच्यावर देखरेख ठेवण्याकरता हा कॅमेरा लावण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.

हेही वाचा >> आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…

तिने सोशल मीडियावर म्हटलंय की, मी १६ वर्षांची मुलगी असून जेईईची तयारी करतेय. सात महिन्यांपूर्वी माझ्या पालकांनी ठरवलं की माझ्या बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. त्यांच्या या निर्णयाविरोधात मी काहीच करू शकले नाही. सीसीटीव्ही कॅमेरा बसवून त्यांनी माझ्यावर २४*७ माझ्यावर पाळत ठेवली. त्यामुळे मी माझी बेडरुम नुकतीच दुसऱ्या रुममध्ये शिफ्ट केली. मला वाटलेलं इथं ते कॅमेरा लावणार नाहीत. पण त्यांनी येथेही कॅमेरा लावला आहे. महत्त्वाचं म्हणजे मी या विरोधात भांडूही शकत नाही. मला लवकरात लवकर हे घर सोडण्याची इच्छा आहे. मी माझ्या पालकांना प्रचंड वैतागले आहे”, असा संताप तिने व्यक्त केला आहे.

पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

तिच्या या पोस्टवर अनेकांनी कॉमेंट्ही केल्या. चोवीस तास मुलीवर लक्ष ठेवण्याच्या पालकांच्या निर्णयावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कपडे बदलण्यासारख्या काही खासगी गोष्टी अशावेळी कशा करता येणार? असा प्रश्न काहींनी विचारला आहे. यामुळे मुलीच्या खासगीपणावर हल्ला असल्याचंही काहींनी म्हटलं आहे. तर, सीसीटीव्हीमुळे मुलीची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, अशीही चिंता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तिच्या खासगी गोष्टी रेकॉर्ड होऊन हॅक होऊ शकतात, अशी भीती यानिमित्ताने आहे. त्यामुळे मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांनी घेतलेला हा निर्णय खरंच योग्य आहे का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतोय.

Story img Loader