कोव्हिशिल्ड लशीचे क्वचित प्रसंगी मानवी शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने प्रथमच ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली. भारतामध्ये अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून ही लस तयार केली होती. भारतीय बनावटीची ही लस फक्त भारतातच नव्हे, तर इतर अनेक देशांमध्येही पुरविण्यात आली होती. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कबुलीनंतर आता सिरम इन्स्टिट्यूट विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय एका मृत मुलीच्या पालकांनी घेतला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊ या.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, रितिका श्री ओम्त्री (वय १८) या मुलीने मे २०२१ मध्ये कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी तिने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून आर्किटेक्चरचा अभ्यास सुरू केला होता. मात्र लस घेतल्यानंतर सात दिवसातच तिला ताप आला. उलट्या आणि अशक्तपणा आल्यामुळे तिला साधे चालताही येत नव्हते. रितिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा एमआरआय रिपोर्ट काढण्यात आला. ज्यामध्ये तिच्या डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे निदर्शनास आले. डोक्यात रस्तस्त्राव झाल्यामुळे दोन आठवड्यातच रितिकाचा मृत्यू झाला.

Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

कोव्हिशिल्डच्या दुष्परिणामांची कंपनीने दिली कबुली; नेमके प्रकरण काय आहे?

रितिकाच्या पालकांना या घटनेमुळे प्रचंड हादरा बसला, पण त्यांनाही त्यावेळेस मृत्यूचे कारण कळले नाही. मात्र त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून तिच्या मृत्यूचे कारण तपासण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांना कळले की, रितिकाला ‘थ्रोब्मोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया’ (TTS) हा आजार होता. लस घेतल्यानंतर दुष्पपरिणाम होऊन तिचा मृत्यू झाल्याचे पालकांना कळले.

विश्लेषण : करोनानंतर अँटिबायोटिक्सची परिणामकारकता घटली? डब्ल्यूएचओच्या अहवालात डॉक्टरांवर ठपका?

इंडिया टुडेने अशीच आणखी एक घटना निदर्शनास आणली आहे. जुलै २०२१ मध्ये वेणूगोपाल गोविंदन यांची मुलगी करुणाचा मृत्यू लस घेतल्यानंतर महिन्याभरताच झाला. करुणाचा मृत्यू लशीमुळेच झाला का? हे तपासण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे त्यावेळी त्यांना सांगण्यात आले होते. आता या दोन्ही मुलींच्या पालकांनी न्यायालयात धाव घेत अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या दुष्पपरिणामुळेच आमच्या मुलींचा मृत्यू झाला, असा आरोप केला आहे. वकील जेमी स्कॉट यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. स्वतः जेमी स्कॉट लशीमुळे पीडित आहेत. एप्रिल २०२१ मध्ये अ‍ॅस्ट्राझेनेका लस घेतल्यानंतर त्यांना मेंदूशी निगडित आजार जडला.

कोव्हिशिल्ड लशीचा त्रास कुणाला होणार?

ॲस्ट्राझेनेकाच्या कबुलीनंतर जगभरात एकच गदारोळ उडाला आहे. आपल्यालाही हे दुष्परिणाम जाणवतील, अशी भीती कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोविड कृती दलाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, कुठलीही लस अथवा औषधाचे दुष्परिणाम असतात. कोव्हिशिल्डमुळे १० लाखांपैकी ८ जणांना हे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणविण्याचा धोका जास्त होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसनंतर तो कमी होत गेला. एवढ्या कालावधीनंतर तर धोका आणखी कमी झाला आहे. एखाद्या व्यक्तीला लशीचे दुष्परिणाम जाणवले म्हणजे त्याचा मृत्यू होत नाही. योग्य उपचारानंतर तो बरा होऊ शकतो. लशीच्या दुष्परिणामाची चर्चा सुरुवातीलाही होती. परंतु, त्यापासून होणारा फायदा जास्त असून, त्यामुळे वाचलेले जीव महत्त्वाचे आहेत, असेही डॉ. गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.