खासदार परेश रावल यांच्या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद विद्यापीठामध्ये झालेल्या कार्यक्रमात परेश रावल यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळताना त्यांची तुलना थेट प्रभू रामचंद्राशी केली. ज्याप्रकारे लंकेत जाण्यासाठी सेतू बांधताना रामनामाच्या सामर्थ्यामुळे शिळा समुद्रावर तरंगल्या होत्या त्याचप्रकारे आम्हीदेखील मोदी लाटेत निवडून आलो. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नावाच करिष्मा इतका जबरदस्त होता की, २०१४च्या निवडणुकीत माझ्याऐवजी इतर कुणीही उभे राहिले असते तर तोदेखील सहजपणे निवडून आला असता, असे परेश रावल यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतील पुरस्कारांविषयी भाष्य केले. चित्रपटसृष्टीत पुरस्कार हे लॉबिंग करून दिले जातात, अशी टीका परेश रावल यांनी केली. तसेच असहिष्णुतेच्या मुद्द्याविषयी विचारण्यात आले असता ,अंगरक्षक घेऊन ऑडी कारमधून फिरणाऱ्यांना कसली आलीये असहिष्णुता, असा प्रतिसवालही त्यांनी विचारला.

Story img Loader