आत्मघाती स्फोटात महिला दहशतवाद्यासह दोन ठार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील शुक्रवारच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर पॅरिसमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यावेळी एका दहशतवादी महिलेने घडवून आणलेल्या आत्मघातकी स्फोटात तिच्यासह दोघांचा मृत्यू झाला. पॅरिस हल्ल्यांचा सूत्रधार अब्देल हमीद अबौद हा या कारवाईत सुरुवातीला ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी त्यासंदर्भात अद्याप अनिश्चितता आहे. रात्री उशिरा फ्रान्सचे भारतातील राजदूत फ्रान्स्वा रिचर यांनी अबौदने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली.
अबौदसह कट रचणाऱ्या इतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सेंट डेनिसमधील एका अपार्टमेंटवर मोठय़ा फौजफाटय़ानिशी छापा टाकला.
त्यावेळी तब्बल चार तास चाललेल्या धुमश्चक्रीत एक जण ठार झाला. तर इतर सात जणांना अटक करण्यात आली. अबौद या अपार्टमेंटमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. शेकडो शस्त्रसज्ज पोलीस या इमारतीत शिरल्यानंतर त्यांना अपार्टमेंटमध्ये दबा धरून बसलेल्यांकडून कडवा प्रतिकार सुरू झाला.
पोलिसांच्या ‘स्व्ॉट’ पथकाने तिघा जणांना अटक केली. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. त्यानंतर या अपार्टमेंटजवळून एक महिला व पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. अपार्टमेंटशेजारी राहणाऱ्या पत्रकार बाप्तिस्ते मारी यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे ४ वाजता हा छापा टाकण्यात आला. त्या वेळी एकापाठोपाठ एक असे दोन स्फोटांचे आवाज त्यांना ऐकू आले. तर तब्बल तासभर अविरत गोळीबार सुरू होता. परिसरातील रहिवाशांना सकाळी साडेसातपर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. या परिसरात एकूण सात स्फोट झाले. मोरोक्कन वंशाचा २८ वर्षीय बेल्जियन दहशतवादी अबौद हा या हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी मोठी शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
क्रूरकर्मा अबौद
पॅरिस हल्ल्यापूर्वीच्या दहशतवादी कारवाया करताना अबौदने आपण पकडता-पकडता वाचलो गेल्याच्या फुशारक्या मारल्या आहेत. युरोपीय चेकपॉइंटजवळ पोलीस आपल्याला ओळखू शकले नाहीत. अल्लाने मेहरबानी दाखवल्यामुळेच संबंधित पोलीस आंधळ्यासारखा वागला आणि आपल्याला ओळखू शकला नाही. एका दहशतवादी हल्ल्याची योजना बेल्जियन पोलिसांनी उधळून लावल्यानंतर त्यांच्या हातावर तुरी देण्यात आपण यशस्वी ठरलो. त्या वेळी आपले इतर दोघे सहकारी मात्र पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडून हुतात्मा झाले, असे त्याने आयसिसच्या ‘दबिक’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अबौद याच्याविषयी सुरक्षा यंत्रणांना मागील वर्षीच समजले होते. आयसिसने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये तो छिन्नविच्छिन्न केलेले देह फरफटत नेणारी कार चालविण्याचा विकृत आनंद लुटताना दिसत होता. सीरियामध्ये जिहादी नेटवर्क प्रस्थापित करण्याच्या गुन्ह्य़ात अबौदला त्याच्या अनुपस्थितीत मागील जुलैमध्ये २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.