पॅरिस हल्ल्यातील संशयित असलेला महंमद अब्रिनी याला इतर चार जणांसह अटक करण्यात आली आहे. ब्रसेल्स विमानतळ व मेट्रो स्टेशनवरील हल्ल्यासंदर्भात टाकलेल्या छाप्यात त्यांना पकडण्यात आल्याचे संघराज्य अभियोक्तयांनी सांगितले. १३ नोव्हेंबला पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यात १३० तर २२ मार्चला ब्रसेल्स येथे झालेल्या हल्ल्यात ३२ जण ठार झाले होते. दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी आयसिसने घेतली आहे. या दोन हल्ल्यांमुळे युरोप हादरला आहे. महंमद अब्रिनी याला अँडेरलेख्त येथे अटक करण्यात आली असे संघराज्य प्रवक्ता कार्यालयाने म्हटले आहे. अब्रिनी समवेत इतर दोन अज्ञात व्यक्तींना अटक केली आहे. आरटीएल दूरचित्रवाणी वाहिनीने त्याबाबत चित्रण दाखवले असून त्यात एक व्यक्ती पोलिसांच्या गराडय़ात चेहरा झाकलेल्या अवस्थेत चालताना दिसत आहे नंतर त्याला करडय़ा रंगाच्या गाडीत घालण्यात आले. अब्रिनी हा मोरोक्को वंशाचा बेल्जियन नागरिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा