फ्रेंच हल्लेखोर अहमदी कोलीबेली याने पॅरिसमध्ये हल्ला करण्यापूर्वी तीन दिवस माद्रिदमध्ये घालविले असल्याचे वृत्त येथील ‘ला वांगुर्दिया’ या वृत्तपत्राने दिले आहे.
३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान तो आणखी एका इसमासमवेत तेथे होता. परंतु या इसमाची ओळख पटली नाही, असे संबंधित वृत्तात म्हटले आहे. गेल्या शुक्रवारी पोलिसांनी सुपर मार्केट उडवून दिल्यानंतर ३२ वर्षांचा कोलीबेली त्यावेळी ठार झाला होता.
याप्रकरणी सध्या पोलीस अधिकारी सखोल तपास करीत असून, याही दिशेने त्यांचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
‘पॅरिसच्या हल्लेखोराने तीन दिवस माद्रिदमध्ये घालविले होते’
फ्रेंच हल्लेखोर अहमदी कोलीबेली याने पॅरिसमध्ये हल्ला करण्यापूर्वी तीन दिवस माद्रिदमध्ये घालविले असल्याचे वृत्त येथील ‘ला वांगुर्दिया’ या वृत्तपत्राने दिले आहे.
First published on: 16-01-2015 at 03:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris attackers spent three days in madrid