पॅरीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली असून त्यातील तथ्यता सुरक्षा यंत्रणा तपासत आहेत. फ्रान्सने सीरियामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे पॅरीसमध्ये हल्ला केल्याचा दावा दहशतवाद्यांनी केला आहे. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याचे जाहीर कौतुक केले असून त्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
जवळपास १५० जण मृत्युमूखी पडलेल्या या हल्ल्यामध्ये आणखी २०० जण जखमी झाले असून त्यातील ८० जण गंभीर जखमी असल्याचे फ्रान्स पोलीसांनी सांगितले. भारतीय वेळेनुसार पावणे तीन वाजता दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. गेल्या दशकभरातला पश्चिम युरोपमधला हा अकरावा दहशतवादी हल्ला आहे.

Story img Loader