केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री सिसराम ओला यांच्या निधनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे राज्यसभेत लोकपाल विधेयकावरील चर्चा आणि त्याची मंजुरी आता एक दिवसाने लांबणीवर पडले आहे. सरकारी लोकपाल विधेयकाबद्दल समाधान व्यक्त करणाऱे अण्णा हजारे यांचे उपोषणही यामुळे लांबणार आहे.
..तर स्वतंत्र आंदोलन करा – अण्णा हजारे
लोकपाल विधेयक संसदेत मंजूर करावे, या मागणीसाठी अण्णा हजारे गेल्या मंगळवारपासून राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सुधारित लोकपाल विधेयकाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून, हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतरच आपण उपोषण सोडू, अशी भूमिका त्यांनी मांडली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी राज्यसभेमध्ये सुधारित लोकपाल विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर होण्याची शक्यता होती. मात्र, ओला यांच्या निधनामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. आता मंगळवारी या विधेयकावर राज्यसभेत चर्चा होऊन त्यावर आवश्यक असल्यास मतदान घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. यामुळे अण्णा हजारे यांचा उपोषणाचा कालावधी आणखी वाढणार आहे.
लोकपालला अण्णांचा पाठिंबा दुर्दैवी 

Story img Loader