भारतीय संसदेवरील हल्लाप्रकरणात न्यायालयाकडून दोषी ठरवून फाशी देण्यात आलेला दहशतवादी अफजल गुरूच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. जम्मू-काश्मीर शालेय बोर्डाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये अफजलचा मुलगा गालिब गुरू याला ९५ टक्के गुण मिळाले आहेत. एकुण ५०० गुणांच्या या परीक्षेत गालिबने ४७४ गुण मिळवले असून त्याला सर्व विषयांमध्ये ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. अफजल गुरूच्या मुलाचे हे यश सोशल मिडीयावर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवल्याबद्दल फुटिरतावाद्यांकडूनही गालिबचे कौतुक करण्यात आले आहे. संसद हल्ल्यातील सहभागप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अफजल गुरूला २०१३ मध्ये फाशी देण्यात आली होती. त्याच्या फाशीवरून बराच गदारोळ झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2016 रोजी प्रकाशित
अफजल गुरूच्या मुलाला दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण
संसद हल्ल्यातील सहभागप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अफजल गुरूला २०१३ मध्ये फाशी देण्यात आली होती

First published on: 11-01-2016 at 13:41 IST
TOPICSसंसदेवरील हल्ला
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament attack convict afzal guru son aces jk 10th board exams