संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून २७ फेब्रुवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे; तर २६ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून २८ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. याच अधिवेशनात सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर केले जाणार आहे.
अधिवेशनाचे पहिले सत्र २० मार्चपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर एक महिन्याच्या सुटीनंतर पुन्हा २० एप्रिल रोजी दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ८ मे रोजी अधिवेशन संस्थगित होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावर २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी चर्चा होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून २७ फेब्रुवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे; तर २६ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून २८ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
First published on: 22-01-2015 at 01:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament budget session starts from 23 february