संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ते का बोलवलं जातं आहे? अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते आहे. अशात संसदेच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडवरून नवा वाद सुरू झाला आहे. संसद कर्मचाऱ्यांना कमळ असलेले जॅकेट्स गणवेश म्हणून देण्यात आले आहेत. हे अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे. एवढंच नाही तर जो गणवेश दिला आहे त्यातल्या जॅकेटवर कमळाचं फुल का? वाघ किंवा मोर का नाही? असाही प्रश्न काँग्रेने विचारला आहे.

काय आहे ड्रेसकोडचं हे प्रकरण?

लोकसभेच्या सचिवालयाने दिलेल्या पत्रानुसार मार्शल, सुरक्षा कर्मचारी, अधिकारी, चेंबर अटेंडेंट आणि चालक यांचे गणवेश बदलण्यात आले आहेत. नव्या संसद भवनात विशेष अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्याआधी हे गणवेश त्यांना परिधान करायचे आहेत. बंद गळ्याच्या सूटच्या जागी अधिकाऱ्यांना गुलाबी रंगाचं जॅकेट घालावं लागणार आहे. कर्मचाऱ्यांना त्यांना गणवेशावर खाकी पँट आणि शर्ट असा ड्रेस देण्यात आला आहे त्यावर फुलांचं डिझाईन असणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या मार्शल्सना मणिपुरी पगडी दिली गेली आहे. तर संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लष्करी गणवेशाप्रमाणे गणवेश देण्यात आले आहेत. महिला कर्मचाऱ्यांसाठी साडी, ब्लाऊज आणि जॅकेट असा ड्रेस कोड ठरवण्यात आला आहे. जॅकेटवर कमळाचं डिझाईन आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”

काँग्रेस खासदाराची भाजपावर टीका

गणवेश बदलले गेल्यानंतर त्यावर जे कमळाचं फूल आहे त्यावरून काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी म्हटलं आहे भाजपा संसदेला स्वतःचं व्यासपीठ म्हणून देशासमोर आणू इच्छिते आहे असा आरोप केला आहे. तसंच टागोर यांनी असंही म्हटलं आहे की गणवेशावर आपला राष्ट्रीय पशू वाघ किंवा राष्ट्रीय पक्षी मोर यांचं चित्र का नाही? त्यावर कमळाचं फूल का? मी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना विचारु इच्छितो की आपल्या सभागृहाची पातळी इतकी का घसरली आहे?

टागोर म्हणाले संसदेच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर भाजपाचं निवडणूक चिन्ह असलेलं कमळाचं फूल आहे. जी २० परिषदेचा लोगोही कमळाचाच होता. आता हे सगळे म्हणत आहेत की कमळ हे राष्ट्रीय फूल आहे. संसद ही सगळ्या पक्षांपेक्षा मोठी आहे, मात्र भाजपाने गणवेशांवर कमळ आणून घाणेरडं राजकारण केलं आहे.

Story img Loader