नवी दिल्ली : राज्यसभेतील सभागृहनेते पियूष गोयल यांच्याविरुद्ध विरोधकांच्या इंडिया आघाडीतील सदस्यांनी हक्कभंग ठरावाची सूचना दिली आहे. गोयल यांनी काही विरोध सदस्यांविषयी केलेल्या शेरेबाजीला आक्षेप घेत ही सूचना देण्यात आली आहे. हक्कभंग ठरावाची सूचना देणाऱ्यांत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राजद, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या सदस्यांचा समावेश आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे ही ठरावाची सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

न्यूज क्लिक या वृत्त पोर्टलबाबत बोलताना गोयल यांनी ही वक्तव्ये केल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. या पोर्टलला भारतविरोधी प्रचार करण्यासाठी चीनशी संबंधित संस्थांकडून निधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. गोयल यांनी हे पोर्टल आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या संबंधांबाबत विचारणा केली होती. त्यासाठी न्यू यॉर्क टाईम्समधील वृत्ताचा हवाला देण्यात आला होता.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा

दरम्यान काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्वीट केले की, मंगळवारी दुपारी १ वाजता इंडियाच्या राज्यसभेतील नेत्यांनी गोयल यांच्याविरुद्धच्या हक्कभंग ठरावाची सूचना दाखल केली आहे. गोयल यांनी संबंधित नेत्यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता. याप्रकरणी गोयल यांनी सभागृहात योग्यरित्या माफी मागितली पाहिजे, असे रमेश यांनी म्हटले आहे.

टीव्हीच्या टिकरने सत्ताधाऱ्यांची कोंडी

काँग्रेसच्या गौरव गोगोई यांचे भाषण सुरू असताना बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी अचानक घेतलेल्या आक्षेपापुढे भाजपच्या सदस्यांचीच नव्हे मंत्र्यांचीही कोंडी झाली. लोकसभेतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण संसद टीव्हीवर दाखवले जात होते व टीव्ही स्क्रीनवर खालच्या बाजूला केंद्र सरकारच्या विविध योजनांचे टिकर चालवले जात होते. दानिश अली यांनी या टिकरवर तीव्र आक्षेप घेत ते बंद करण्याची मागणी केली.  अविश्वास ठरावावर चर्चा सुरू असताना संसद टीव्हीवर केंद्र सरकार स्वत:च्या योजनांचे गुणगान कसे करू शकते, असे दानिश अली यांचे म्हणणे होते. दानिश अली यांचा आक्षेप इतका बिनतोड होता की, भाजपचे सदस्य निरुत्तर झाले. इतकेच नव्हे तर, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनाही अली यांचा आक्षेप फेटाळता आला नाही. विरोधकांनी मागणी कायम ठेवल्याने लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी टिकर बंद करण्याची सूचना दिली. ‘तुमच्या आक्षेपाची मी नोंद घेतली आहे पण, टिकर बंद करण्याचे बटन माझ्याकडे नाही’, असे बिर्ला म्हणाले.