बुधवारी संसदेत झालेल्या घुसखोरीप्रकरणातील सूत्रधार ललित झा यानं बुधवारी ( १४ डिसेंबर ) रात्री दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर तरूणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर ललित झा फरार झाला होता. त्यानंतर पोलीस ललित झाचा तपास करत होते.

दिल्ली पोलिसांनी ‘एएनआय’ला दिलेल्या माहितीनुसार, “संसदेत घुसखोरी करून सुरक्षेचा भंग केल्याच्या प्रकरणातील आरोप ललित मोहन झा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याची चौकशी करण्यात येत आहे.”

हेही वाचा : संसदेच्या सुरक्षेवरून खासदारांचा गोंधळ, १४ सदस्यांचं निलंबन; अमित शाह विरोधकांना सुनावत म्हणाले…

“नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओ बनवून ललित झानं घटनास्थळावरून पलायल केलं. त्यानंतर ललितने बसच्या माध्यमातून राजस्थामधील नागौर शहर गाठले. तिथे त्यानं दोन मित्रांची भेट घेतली आणि एका हॉटेलमध्ये वास्तव्य केलं. त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ललित दिल्लीला आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली,” असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा : “संसदेत आंदोलन करणाऱ्या तरूणांना शिक्षा झाली पाहिजे, पण…”, असीम सरोदेंनी मांडलं मत, लातूरच्या तरूणाची कायदेशीर बाजू लढवणार

दरम्यान, लोकसभा आणि संसदेच्या आवारात नळकांड्या फोडल्याप्रकरणी सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आजाद यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. या सगळ्यांना १३ डिसेंबर रोजी संसदेत गदारोळ करण्यासाठी ललित झाने सांगितल्याचं समोर आलं आहे. संसदेच्या आवारात नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओ ललित झानं बनवला होता. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ललित फरार झाला.

Story img Loader