लोकसभेच्या आत आणि बाहेर धुराचे लोट पसरवून घोषणाबाजी करणाऱ्या चार आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संसदेत आणि संसदेच्या बाहेर चार जणांनी धूर पसरवला, उड्या मारत घोषणाबाजी केली. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक चौकशी समिती तयार केली होती. त्यात संसदेच्या सुरक्षेत बाधा आणणाऱ्या एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. यातले दोन युवक हे लोकसभेच्या सभागृहात गेले होते. तिथे त्यांनी धूर पसरवला आणि घोषणाबाजी केली. तर एक महिला आणि एक पुरुष यांनी संसदेच्या बाहेर निदर्शनं केली आणि धूर पसरवला. या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या चार आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आलं. या सगळ्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चार आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत

दिल्ली पोलिसांनी या सगळ्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. दिल्ली पोलिसांनी या आरोपींसाठी १५ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. संसदेच्या सुरक्षेत बाधा आणण्यासाठी हे सगळे कारणीभूत ठरले होते. या प्रकरणात विक्की शर्मा आणि त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा फरार आहे. मनोरंजन डी, सागर शर्मा, नीलम आजाद आणि अमोल शिंदे अशी चार आरोपींची नावं आहेत या सगळ्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
flying squad, seizes more than 2 crore rupees, maharashtra assembly election 2024
वसई-विरार पालिका परिसरात सलग दुसर्‍या दिवशी पैशांचा पाऊस, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त

हे पण वाचा- Parliament security breach : मास्टरमाईंड ललित झा अजूनही फरारच, शेवटचं लोकेशन होतं ‘हे’ शहर

पोलिसांच्या प्राथमिक तपासात काय समोर आलं?

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की सागर शर्मा हा लखनऊचा राहणारा आहे. डी मनोरंजन हा कर्नाटकच्या मैसूरचा रहिवासी आहे. हे दोघे लोकसभेत गेलेले तरुण आहेत. या दोघांनी आतमध्ये जाऊन धूर पसरवला. धूर पसरवण्याची सामग्री त्यांनी बुटात लपवून आणली होती. भाजपा खासदार प्रताप सिन्हा यांच्या कार्यालयातून या दोघांना पास मिळाला होता. संसदेच्या बाहेर जे दोघं घोषणा देत होते आणि धूर पसरवत होते त्यातली नीलम आजाद ही हरियाणातल्या हिसारची आहे तर चौथा आरोपी अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूरचा आहे.

कोण आहेत हे आरोपी?

बुधवारी लोकसभेत पिवळा धूर पसरवणारे आणि बाहेरही धूर पसरवून घोषणाबाजी करणारे आरोपी कोण आहेत? ते काय करतात या सगळ्याची ओळख पटली आहे. सागर शर्मा, नीलम आझाद, मनोरंजन, डी, अमोल शिंदे, विक्की शर्मा आणि ललित झा यांच्यात कुठलीही समानता नाही. सगळे आरोपी वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय किंवा नोकरी करतात. बेरोजगारी, मणिपूर हिंसा असे मुद्दे समोर आणण्यासाठी आम्ही हे सगळं केलं असं या आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे. या आरोपींमध्ये कुणी इंजिनिअर आहे तर कुणी ई रिक्षा चालक.

काय घडली घटना?

लोकसभेचं कामकाज सुरु होतं. शून्य प्रहर संपण्यासाठी काही मिनिटं उरली होती. त्यावेळी लोकसभेच्या गॅलरीमध्ये बसलेल्या दोन युवकांनी मुख्य भागात उडी मारली. जिथे खासदार बसतात, त्या ठिकाणी त्यांनी उड्या मारुन आपल्या बुटातून स्प्रे काढला आणि धूर पसरवण्यास सुरुवात केली तसंच नारेबाजीही केली. या दोघांनाही खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. आतमध्ये ही घटना घडत असतानाच लोकसभेच्या बाहेर एक महिला आणि एक तरुण या दोघांनीही धूर पसरवत नारेबाजी केली. या महिलेचं नाव नीलम आणि मुलाचं नाव अमोल शिंदे असल्याचं समजतं आहे. या सगळ्या आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.