Lok Sabha Session 2024 : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज (२५ जून) दुसरा दिवस आहे. आजही खासदारांचा शपथविधी जारी राहील. सोमवारी (२४ जून) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २६६ खासदारांचा शपथविधी पार पडला. आज उर्वरित खासदारांना शपथ दिली जात आहे. यासह भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) लोकसभेच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा करत होते.
Parliament Session Video : मोदींची तिसरी टर्म, पहिलं अधिवेशन, संसदेत काय घडतंय? पाहा LIVE
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडीने) देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असून १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून (२४ जून) सुरू झालं आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
First published on: 25-06-2024 at 12:10 IST | © IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament session 2024 day 2 live mps oath taking ceremony lok sabha speaker election asc