Lok Sabha Session 2024 : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज (२५ जून) दुसरा दिवस आहे. आजही खासदारांचा शपथविधी जारी राहील. सोमवारी (२४ जून) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २६६ खासदारांचा शपथविधी पार पडला. आज उर्वरित खासदारांना शपथ दिली जात आहे. यासह भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) लोकसभेच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनडीएच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराला आज रात्री १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजपा पुन्हा एकदा ओम बिर्ला यांच्या खांद्यावर लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवू शकते.