Lok Sabha Session LIVE : १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं असून आज (२८ जून) या अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. भाजपा खासदार अनुराग ठाकूर लोकसभेतील चर्चेला सुरुवात करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावार आज चर्चा होणार आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै रोजी उत्तर देतील. दरम्यान, NEET पेपर लीक प्रकरणावरून देशातलं वातावरण तापलेलं असून याचे संसदीय अधिवेशनावर पडसाद उमटू लागले आहेत. विरोधक या मुद्दयावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, काँग्रेस खासदार नसीर हुसैन आणि आययूएमएलचे खासदार अब्दुल वाहेब यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर चर्चेसाठी सभागृहात स्थगिती प्रस्ताव मांडला आहे. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेच्या आवारात पत्रकार घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते NEET पेपर लीक प्रकरणावर भाष्य करू शकतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament session 2024 day 5 live rahul gandhi wants discussion on neet paper leak motion of thanks president speech asc
First published on: 28-06-2024 at 11:24 IST